Volunteers conducting a Diya painting Workshop
 

 

मैत्री जीवांचे

मनपरिवर्तन शिबीर हि संकल्पनाच मुळी मनाने परिवर्तन व्हावे अशी आहे. वेगवेगळे प्रयोग, कार्यक्रम मुलांबरोबर घेतले जातात. मुळातच मनापासून कला या मुलांमध्येच असते. परंतु ती बाहेर काढण्यासाठी समतोल सातत्याने प्रयोग करते. शिबिरातील मुले ५ ते १५ वयोगटातील असतात, शिवाय हि मुले बाहेर राहिली असल्यामुळे काम करण्याची सवय असते त्यामुळे आम्ही त्यांना काम न देता प्रशिक्षण म्हणून प्रयोग करतो.

दिपावली सणाचे महत्त्व अनेक गोष्टींनी महत्त्वाचे आहेत. यामध्ये दिवा हा त्यातला मुख्य बिंदू आहे. या दिव्याला वेगवेगळे रंग, आकार, नक्षीकाम मुलांनी आपल्या विचारांनी करावेत म्हणून अभिजीत , रश्मी व त्यांच्या मित्रांचा समुह मागील २ वर्षापासून मुलांना मनपरिवर्तन शिबिरात प्रशिक्षण देत आहे. शिबिरात अनेक पणत्या आणल्या जातात यामध्ये काही पणत्या मुलांकडून खराबही होतात परंतु तेच अपेक्षित असते कारण मुलांना त्यामध्ये जास्त आनंद मिळतो त्यातूनच नवीन कलाकृती तयार होते. मुले मनाने त्यात रंग भरतात म्हणूनच या एकत्रीकरणाला नाव दिले आहे “मैत्री जीवांचे”.