२६/११ ला समतोल मित्र बना व समतोलच्या निगराणी पथकात सामिल व्हा

२६/११ ला समतोल मित्र बना व समतोलच्या निगराणी पथकात सामिल व्हा


२६/११ रेल्वे स्टेशनवरील झालेला हल्ला आपण विसरला नसाल. कसे विसराल कारण साऱ्या जगाला याचा धक्का लागला होता. आज या गोष्टीला ८ वर्षे पूर्ण झाली तरीसुद्धा तो आक्रोश आताही कानात धुमसत आहे.

या संदर्भात अनेकांनी तर्क वितर्क लावले, सुरक्षासंबंधी सर्व यंत्रणा कामाला लावल्या पण अजूनही आपण सुरक्षित आहोत का प्रत्येकाला याबाबत शंका वाटते. लहान मुलांचा या हल्ल्यात जास्त प्रमाणात मृत्यू झाला देशाची सुरक्षा याबाबत चिंता व्यक्त करत आहे. पण आपण सर्वांनी याला आव्हान म्हणून स्वीकारले पाहिजे.

समतोल हेच काम रेल्वे स्टेशन वर गेली १२ वर्षे करत आहे. हल्ल्याच्या वेळी सुद्धा मुलांना सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यासाठी कार्यकर्ते तत्पर होते. वेगवेगळ्या कारणांनी घर सोडून येणारी मुले स्टेशन वरच उतरतात. मुंबईत येणारी संख्या १५०/२०० च्या आसपास आजही आहे. या मुलांना या चक्रातून बाहेर काढून पुन्हा कुटुंबात पुनर्वसन करण्याचे काम समतोल सातत्याने करत आहे. म्हणून आतापर्यंत ६००० पेक्षा जास्त मुले कुटुंबांशी जोडली गेली.

पोलीस यंत्रणा, रेल्वे यंत्रणा, सर्व यंत्रणा तत्पर असल्या तरी समतोलची टीम देशाच्या या सुरक्षितेसाठी मुलांच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनवर  निगराणी ठेवण्याचे काम करत आहे. मुंबईतील सीएसटी, दादर, कुर्ला, कल्याण, मुंबई सेन्ट्रल, बोरीवली या स्टेशनवर समतोल कार्य करते.

 फक्त रेल्वे स्टेशन वर काम करणारी हि संस्था आपले योगदान देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र देत आहे.

आता तर याचा विस्तार वाढला असून भुसावळ व पुणे या स्टेशनवरही निगराणी ठेवत आहे. मुलांना तर मदत होत आहेच पण अश्या हल्लेखोरांवरही लक्ष ठेवून असते व यंत्रणांना याची माहिती देत असते. आपण हे हल्ले रोखू शकतो. यंत्रणांना अधिक जागृत करू शकतो. तुम्हाला समतोल मित्र बनून हे काम अधिक सोप्या पद्धतीने करता येईल कारण आपण देशाची सुरक्षा करत आहोत याचा आनंद अधिक असेल तर बनूया समतोल मित्र. संपर्क करा समतोल फाऊनडेशन ला www.samatol.org  भेट द्या. ९८९२९६११२४ – विजय जाधव