Samatol Mitra 26/11

 

समतोल मित्र बना व समतोलच्या निगराणी पथकात सामील व्हा


 

२६/११ च्या तारखेला आठवण येते ती रेल्वे स्टेशन वर हल्ला झाल्यची. अश्या प्रकारचे हल्ले समाजाने रोखावे म्हणून पोलीस यंत्रणा नेहमीच आवाहन करते. याचा धागा पकडून समतोल करत असलेले कार्य रेल्वे स्टेशन वर चालते.

या समतोलच्या पथकात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेतल्यास मुलांबरोबर अश्या हल्लेखोरांवरही निगराणी ठेवता येईल.

समतोल मित्र बना व समतोलच्या निगराणी पथकात सामील व्हा असा संदेश देणारा फलक आम्ही सकाळी ११ ते २ या वेळात ठाणे रेल्वे स्टेशन च्या बाहेर लावला. या देशाला संविधान देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बाहेरच मोठा पुतळा आहे. आज संविधान दिवस असल्यामुळे तेथेही कार्यक्रम सुरु होते. दोन्ही कार्यक्रम अति महत्त्वाचे आहेत. परंतु दोघांचाही खरा उद्देश्य समाजातील सुरक्षा व संरक्षण हक्क अधिकार असाच असल्यामुळे प्रचंड गर्दी होती.

 समतोल मित्र या अभियानात तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला. सामाजिक कार्यात भाग घ्या , देशाचे संरक्षण करा, आतंकवाद नष्ट करा, निगराणी पथकात सामील व्हा असे आमचे कार्यकर्ते सांगत होते. समतोल मित्र जेवढे बनतील तेवढी जास्त निगराणी पथके बनतील असा संपर्क आम्ही आज केला आहे. त्याचबरोबर संविधान दिवसांचेही महत्त्व सांगितले आहे. हे पथक दुपार नंतर वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर समतोल मित्र बनविण्यासाठी प्रयत्न करतील. मला वाटते यातच समाजाचा समतोल बनेल याची खात्री आहे.

जय हिंद