जेव्हा 9 वर्षाचा श्रीकांत पुन्हा आईला भेटला....

हैद्राबाद मधील श्रीकांत वडारी वय 9 वर्षे अचानक मुंबईत आला काही पत्ता सांगता येत नव्हता हिंदी भाषा जराही समजत नव्हती. अशा मुलांचे घर शोधून काढणे आव्हान असते.

समतोल ने अशी आव्हाने नेहमीच म्हणजे रोजच स्विकारते 20 दिवसात मुलाचे घर शोधून काढले हैद्राबाद मधील आमचे स्नेही युथ फॉर सेवा च्या ग्रुपने चप्पा ना चप्पा हैद्राबाद मधील शोधला व मुलाचे घर शोधून काढले. 

यासाठी आमचे सहकारी हरीहरन यांनी ही हैद्राबाद मध्ये जावून मुलाच्या घरची परिस्थिती जाणून घेतली व मदतीचा हात दिला आहे. 

पोलिस कंट्रोल रूम, चाइल्ड लाईन सर्वांना सांगितले पण कोणी ही यंत्रणांनी प्रतिसाद दिला नाही खरतर यासाठी संवेदनशील ता हवी असते.