Happiest day in a Donors Life


९ सप्टेंबर एक दिवस आनंदाचा

     ऐश्वर्या जोशी समतोलशी जुडलेले एक नाव.  समतोल मित्र म्हणून मुलांसाठी जे काही करता येईल असा प्रयत्न करणारे व्यक्तिमत्त्व.

     राहण्याचे ठिकाण दुबई परंतु कुटुंबाशी आणि देशाशी असणारे प्रेम वर्षातून एकदा का होईना भारतात येते.  भारतात आल्यावर महाराष्ट्रातील ठाणे शहरात राहते.  समतोलच्या कार्याशी असलेले प्रेम तिला स्वस्त बसू देत नाही.  सामतोलचे कार्य पुनर्वसनाचे आहे याबद्दल तिला अभिमान वाटतो.  मनपरिवर्तन शिबिरात येण्यासाठी प्रचंड उत्सुक असते पण वेळेचे बंधन आहेच.  समतोलच्या मनपरिवर्तन शिबिरातून पुनर्वसित झालेली मुले हिने शिक्षणासाठी दत्तक घेतली आहे.  आपल्या स्वतःचा एक मित्रांचा ग्रुप बनवून मदत करण्याचे कार्य हिने स्वतःशी बांधून घेतले आहे.

     दशरथ , तौफिक , दयाल आणि राकेश हि चारही मुले ताई येणार म्हणून वाट पाहत असतात. यामधला आकाश कणसे हा दहावीत ६०% मिळवून बाहेर पडला व कॉलेज करतोय. दहावीत चांगले मार्क मिळाले म्हणून घड्याळ भेट  आवर्जून दिली.  स्टेशनवरील गणपती म्हणून समतोलच्या ठाणे शेल्टर मध्ये गणपती स्थापना होते.  गणपती उत्सवात स्टेशनवरील मुले व काही स्टेशन वर राहणारी कुटुंबे यांना एकत्र करत त्यांना रोज खायला मिळणारे पदार्थ न देता पिझ्झा मागविला. शिवाय सर्वांची शारीरिक तपासणी डॉक्टरामार्फत केली. सर्वाना आपलेसे करत ९ सप्टेंबर चा दिवस वर्षभरासाठी कायमचा स्मरणात राहील असा केला.  व तीचे विमान पुन्हा दुबईच्या दिशेने झेपावले.  आता पुन्हा आम्ही पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी गणपती बाप्पा व ऐश्वर्या ताई यांची आठवण व आनंद मनात ठेवत वाट पाहत राहू.

आमची ताई ऐश्वर्या ताई – आकाश कणसे, दशरथ , तौफिक , दयाल , राकेश