28th Manaparivaran Shibir

२८ वे मनपरिवर्तन शिबीर

मनपरिवर्तन शिबीर हे समतोलच्या उपक्रमातील महत्त्वाचा भाग आहे.  प्रत्येक शिबीर सुरु होताना वेगवेगळे प्रयोग आपण आतापर्यंत करत आलो आहोत.  त्यामुळे अनेक नवीन नवीन प्रसंग अनुभवायला मिळाले. 

      कधी सिनियर सिटीझन कार्यकर्ते घेऊन कॅम्प केला तर कधी नवीन कार्यकर्ते घेऊन कामाचा अनुभव नसलेल्यांना कॅम्प करायला लावले व ते यशस्वी पण झाले.

      आताचे शिबीर हे २८ वे मनपरीवर्तन शिबीर आहे.  आपण प्रत्येक मौसम मध्ये शिबीर लावतो म्हणजे ऋतूप्रमाणे उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी.  सध्याचे शिबीर हे हिवाळी शिबीर असेल.  या दरम्यान दिवाळी येते.  त्यामुळे अधिक उत्साह व आनंद असतो.  दिपोत्सव कार्यक्रम त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी दरवर्षी होतो. 

      सध्याचे शिबीर २५ सप्टेंबर २०१६ ते १४ नोव्हेंबर २०१६ या दरम्यान सुरु असेल.  स्थान नेहमीप्रमाणे हिंदू सेवा संघ, कल्याण मुरबाड रोड, मामणोली गाव, कल्याण पश्चिम येथे स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्रात असेल.  मुलांची संख्याही नेहमीप्रमाणे २५-३० च्या दरम्यान असेल.  जुने-नवे कार्यकर्ते असतीलच.  यावेळी वेगवेगळे प्रयोग केले जातील.  नियोजन सुरु आहे फक्त मुलांच्या भेटीसाठी आपण यायचे आहे.

      कारण आम्ही बालप्रेमी आहोत.