29th Manaparivartan Shibir

 २९ वे शिबीर

 

बघता बघता २८ शिबिरे झाली. वर्षाला ३ या प्रमाणे शिबिरे सुरु करून ९ वर्ष झाली. प्रत्येक शिबिरामध्ये २५ ते ३० मुलांची संख्या असते.कधी थोडी जास्त ही होते, त्यामुळे ८०० च्या आसपास मुलाना ४५ दिवसात योग्य ते संस्कार, काळजी,संरक्षण.अंतर्गत सुविधा,समुपदेशन  व इतर सर्व गोष्टींची पूर्तता करत वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृतीसाठी  समारोप घेतले. या सामारोपाच्या माध्यमातून अनेक मान्यवर, पत्रकार,संगीतकार,नाटकार,साहित्यक.व्यापारी,सामाजीक कार्यकर्ते अशा प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर चा सहभाग लाभला.

       २९ वे शिबीर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सुरु होत आहे. सदर शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिक्षण मंडळा चे पदाधिकारी यांच्या हस्ते झाले.

       खर्या अर्थाने तिळगुळ वाटून आम्ही मुलांबरोबर आनंद साजरा करणार आहोत.

आपणही शिबिरात येऊन असाच आनंद वाटावा.

तिळगुळ घ्या आनंद वाटा

समाजाचा समतोल राखा