Samatol Mitra Mahotsav Celebration on 30/1/17

 

समतोल मित्र महोत्सव

Samatol Mitra

समतोल फांऊडेशनचा कामाचा विस्तार व अडचणीत असणाऱ्या मुलांना होणारी मदत बघता जास्तीत जास्त लोकांपर्यंत कार्य जावे जनसहभाग वाढवा म्हणून समतोल मित्र संकल्पना पुढे आली.यासाठी समतोल परिवाराने,ठाणे,मुंबई,भुसावळ, जळगाव,संभाजी नगर, पुणे येथे समतोल मित्र बनवले आहेत. या मित्रांना समतोल कार्याची सविस्तर माहिती मिळावीव त्यांनी प्रत्यक्षात काम पाहावे असा कार्यक्रम करण्याचे ठरविले.

याची सुरुवात म्हणून समतोल या मुलांसाठी मनपरिवर्तन शिबीर घेत असते हे शिबीर हिंदू सेवा संघ मामणोली येथे चालते.

मामणोली गावातील समतोल मित्र नेहमीच मदत करतात परंतु महिलांचाही यात समावेश असावा त्यांनी प्रत्यक्ष काम पाहावे म्हणून हळदीकुंकू कार्यक्रम,शालेय मुलांचा सहभाग,वनवासी महिलांचे खेळ,गाणी असे एकत्रित कार्यक्रम ठरवून ३० जानेवारीला आम्ही समतोल मित्र महोत्सव भरवला.

 

शिबिरातील मुले = २५

शालेय मुले     = ६०

वनवासी महिला = १०

मामणोली      = २०

समतोल मित्र   = २०

असे एकूण     = १५० च्या आसपास संख्या सहभागी झाल्या.अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाटकाचा कार्यक्रम इथल्या महिलानी पाहावा         हा त्यामागे उद्देश होता.

मुलांसाठी दिव्यांग मुलांचा संगीतमय कार्यक्रम केला.आमचे सहकारी एस.हरिहरन यांचा कार्यक्रमात वाढदिवस साजरा करत त्यांनी समतोल मित्र जास्त प्रमाणात करण्यासाठी विशेष सहकार्य म्हणून निधी उपलब्ध करू असे आश्वासन दिले. असे महोत्सव वेगवेगळ्या ठिकाणी साजरे करत समाज बालप्रेमी बनवण्याचे प्रयत्न समतोल सातत्याने करीत राहील.