२९ वे मनपरिवर्तन शिबिर ए शक्त्या चल पळ पायात वान्हा नको घालू पळ लवकर

२९ वे मनपरिवर्तन शिबिर
ए शक्त्या चल पळ
पायात वान्हा नको घालू पळ लवकर.


             

 हे शब्द आहेत शिबिरातील विरू भोसले अकलूज मधील ८ वर्ष वयाच्या मुलाचे. मुंबईमध्ये अनेक वेळा मोठ्या मुलांच्या संगतीने फिरायला म्हणून यायचा  मुंबईची गोडी लागली मोठ्या मोठ्या बिल्डिंग,लाईट,स्टेशन ला लावलेले स्क्रीन हे पाहून विरूला अकलूज मध्ये राहवयाचे नाही म्हणून तो  मुंबई ला ट्रेन मध्ये फिरायला यायचा. पारधी समाजाचा असल्यामुळे फिरणे हि त्याची सवयच होती.पण आपल्याला जोडीदार असावा म्हणून विर ने पुन्हा अकलूज ला जाऊन आपला मित्र शक्ती पवार याला आणले दोघांची खूपच मैत्री भारी  जणू जय-विरू सारखी.
     शक्ती धीरुडी समाजाचा दोघांची हि शाळा वेगळी पण दोघेही दोघानाच समजेल अशी भाषा बोलायचे. शक्ती यायला तयार नाही म्हणून विरु ने त्याला विमानात बसायला मुंबईत मिळतं असे सांगितले त्यामुळे शक्ती विमान बघायला मिळेल या आनंदाने विरू बरोबर आला. दोघे सारख्याच वयाचे असल्याने कोणीही त्यांना पैसे व खायला द्यायचे त्यामुळे त्यांना तशी काही चिंता नव्हती. शिवाय बाहेरचा प्रवास बराच झाल्याने माणसे ओळखण्याची कला त्यांना अवगत होती. विरू आणि शक्ती सांताक्रूझ ला पोहचले. तारेचे कुंपण पोलीस कर्मचारी बघून शक्तीने विचारले “अरे इमान कुठं हाय” वीरूने लगेच उत्तर दिले “विमान थांबत का जमिनीवर ते तर लगेच उडत असतंय”,
“त्यामुळे तुला बसायला नाय मिळत”.दोघांनीही प्रयत्न केला पण काही आत जाता आले नाही फिरता फिरता सी.एस.टी. स्टेशनवर आले.आणि समतोलच्या कार्यकर्त्यांची नजर त्यांच्यावर पडली.दोघांनाही जवळ घेऊन  विचारपूस केली.त्यांनी खोटे नाटे सांगितले पण रोजची सवय असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतले.

अशा प्रकारची अनेक राज्यातली वेगवेगळ्या पण छोट्या छोट्या कारणांनी शहराकडे येणारी रोजची मुले वाटेल तिकडे भरकटत जातात.

२९ व्या शिबिरात छत्तीसगढ,पं.बगाल,मध्यप्रदेश,तामिळनाडू,आंध्र प्रदेश,महाराष्ट्र या राज्यातील २५ मुले होती. भाषा वेगळी,समस्या वेगळी कारणे वेगळी पण भावना सर्वांच्या एकच होत्या.वेळ आली म्हणून मागतो अस मुलं म्हणतात परंतु भीक शब्द लवकर उच्चारात नाहीत.

    संक्रातीच्या दिवशी मुलांचे शिबिर सुरु केले प्रत्येक शिबिरात कार्यकर्त्यांची कसोटी लागते. २५ सायकली चोरणारा,ट्रक वाल्याकडून हप्ते जमा करून पोलिसांना देणारा,आरोपीची माहिती पोलिसांना खबर करणारा तर वडिलांनी दारूपायी पटरीवर फेकून देणारे या शिबिरात होते.

शिबिरातून पळून जाण्या साठी सुरवातीला अनेकदा मुले प्रयत्न करत,पण कार्यकर्त्यांनी लावलेला जीव मुलांना गुंतवून ठेवतो म्हणून तर मुले पळत नाहीत हेच या शिबिराचे वैशिष्ट्य असते. मुलांच्या मनाचे परिवर्तन झाले तरच पुन्हा तो त्या मार्गाला जाणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी दाखवण्याचा त्यांना समजण्याचा प्रयत्न शिबिरात असतो. शाळेत जाऊनही लिहिता वाचता न येणारी मुले १० दिवसातच स्वतःचे नाव पत्ता लिहितात घरातून बाहेर राहणे साधे काम नाही. मुलंही बुद्धीने हुशार असतात व त्यांना सांभाळणे तेवढेच कठीण असते.
     

मकर संक्रांत ,२६ जानेवरी,समतोल मित्र महोत्सव, महाशिवरात्रीची तयारी मुलांनी आपल्या मनाने पण आनंदात साजरा केला.आलेल्या पाहुण्यांनी आम्ही असा उत्सव कधीच पहिला नाही असे उद्गार काढायला लावतात.

घराची आवड,शिक्षणाची आवड,होस्टेलमधील शिस्त याचा परिचय झाल्यावर मुलांना मुलांच्या घरी संपर्क करणे,पालकांचे समुपदेशन करण्यात येते. अनेक पालकही मुलांची  चातकाप्रमाणे वाट पाहत असतात याची जाणीव असतेच.

५ मार्चला घाटकोपरच्या शेठ धनजी देवशी राष्ट्रीय शाळेत सकाळच्या सत्रात या मुलांना पालकांकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला.महिला बाल विभाग बालकल्याण समितीचे

श्री संजय सेंगर,अकोला अध्यक्ष ,महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे  डायरेक्टर राजू पाटील व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांताचे सदस्य प्रमुख श्री.विवेकजी भागवत उपस्थित होते.

ज्या पालकांना अंधत्व आहे त्या आई वडिलांच्या काळजाला जेव्हा स्वतःच्या मासांच तुकडा चिकटतो. तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात तेव्हा सभागृहतील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येतात, भावनांना वाट मोकळी होते हेच तर सामातोलचे खरे लक्ष्य आहे.

आपला समाजा हा बालप्रेमी समाज व्हावा, मुलांबद्दल प्रेम राहावे अडचणीत असणारे मुल हे माझे मुल हि भावना तयार व्हावी म्हणून हा प्रयत्न केला जातो.

शासन दरबारी याची दखल घ्यावी म्हणून प्रयत्न केले जातील असा विश्वासही मिळतो.खऱ्या अर्थाने समाजाचा समतोल बांधला जातो .पुढचे शिबिर असेच नवीन मुलांना घेऊन होईल –

कारण अजूनही समाजात असमतोल आहे.