समतोल फाऊंडेशन उन्हाळी शिबीर

 

                             मनपरिवर्तन केंद्र


समतोल फाऊंडेशन शिबीर प्रक्रिया ही मुलांन संदर्भातील एक वेगळा प्रयोग आहे.असे अनेक  वेळा आपण शिबिरातून दाखून दिले आहे.

 

मागील वर्षामध्ये २००९ नंतर २०१७ मध्ये होस्टेलमध्ये किंवा निवासी वसतिगृहात शिक्षणासाठी जी मुले वेगवेगळ्या ठिकाणी दाखल केलेली आहेत तेथील मुलांचे उन्हाळी सुट्टीतील शैक्षणिक गंमतजंमत शिबीर आपण घेत आहोत.

     समतोल सुरु होऊन १२ वर्ष झाली अनेक मुले संपर्कात आली राष्ट्रीय स्तरावर कुटुंबाकडे हस्तांतरित करून पुनर्वसनही केले,परंतु अनेक मुलांनी आपले घर,पत्ता आठवणीत राहील तेवढीच माहिती त्यांनी शिबिरामध्ये दिली घराकडे पत्र,संपर्क केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे अनेक मुलांना कायमस्वरूपी शिक्षणासाठी व्यवस्था करणे भाग होते व ती संस्थे मार्फत करण्यात आली.

 

     महाराष्ट्रातील नावाजलेल्या काही शिक्षण संस्था व काही नवीन प्रयोग करणारे संस्था यांच्याकडून हा मुलांचा विकास होत असल्याचे दिसून येत आहे.त्यापैकी ज्ञानप्रबोधिनी-हराळी-सोलापूर,प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर निवासी शाळा-

नागपुर,बालस्नेहालय प्लॅटफॉर्म निवासी शाळा-ठाणे या शाळांमध्ये या स्पेशल मुलांसाठी खास व्यवस्था झाली आज ही  मुले मागील ४/५ वर्षापासून शिक्षण घेत  आहेत.बरीचशी मुले उच्चपदावर जातील अशी अपेक्षा आहे.मुळातच जी मुले स्टेशनवर फिरली ,राहिली परिस्थितीनुसार भीख मागणे,नशा करणे इत्यादी अनेक समस्यांना तोंड देत होती तीच मुले समतोलच्या संपर्कात आल्यावर मनपरिवर्तन केंद्रातून मनपरिवर्तन होऊन समाज्याच्या मुख्य प्रवाहात आली यातील काही मुले हे आपले हक्काचे घर म्हणून समतोलच्या मनपरिवर्तन केंद्राला सुट्टीतला आनंद व्यक्त करण्यासाठी येत असतात.या वेळेस मुलांच्या इच्छेनुसार उन्हाळी शिबीर घेऊन जास्तीत जास्त आनंद देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

 

 

शिबिरा संदर्भातील माहिती मुलां संदर्भात असणारया सर्व विभागाना दिली जाईल त्यामध्ये  महिला बालविकास,पोलीस यंत्रणा,बालकल्याण समिती या शिबिराला भेट देतील व मुलांचे व संस्थेचे मनोबल वाढवतील अशी अपेक्षा आम्ही करतो कारण आम्हाला बालप्रेमी समाज घडवायचा आहे व समतोल साधायचा आहे.

 

दिनांक: १५ मे ते ४ जून २०१७

स्थान: स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्र,

      हिंदू सेवा संघ,मामणोली-मुरबाड रोड,

      कल्याण(पश्चिम).

कल्याण स्टेशन पासून १७ किमी अंतरावर.