सामाजिक कार्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम

                            समतोल फाउंडेशन आयोजित     

                       सामाजिक कार्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम

      गुरुवार  दिनांक : ११ जानेवारी २०१८ ज्ञानसाधना महाविद्यालय,ठाणे. येथे सामजिक कार्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम विषयक पहिले सत्र झाले.   प्रथम,दितीय व तृतीय वर्षाच्या समाजशास्त्र विषयाचे  विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी उपस्थित होते.  २४ तासांचा अभ्यासक्रम दर गुरुवार , शुक्रवार ११.३० ते १.३० या वेळात घेण्यात येणार आहे.   तरुण पिढीने सामाजीक क्षेत्रात काम करावे.किमान आठवड्यातील एक तास तरी सामजिक कार्यसाठी द्यावा किंवा  सामाजिक क्षेत्रातील कार्याची सखोल ओळख व आवड निर्माण करण्यासठी महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांसाठी समतोल तर्फे विशेष अभ्यासक्रम घेण्यात  येतो.

आजच्या अभ्यासक्रमाचा मुख्य विषय j.j. act विषयक माहिती व मार्गदर्शन तसेच बालकल्याण समिती ची कार्यप्रणाली असा होता. बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती. मीनल  ठाकूर यांनी या विषयी मार्गदर्शन केले. बालकांविषयी चा कायदा आणि बाल कल्याण  समिती करत असलेली अंमलबजावणी याची विस्तृत स्वरुपात माहिती दिली  बाल कल्याण समितीचे कामकाज पहाताना आलेली प्रकरण त्यातून आलेले अनुभव  आणि सामाजिक दृष्टीकोन याची सांगड घालून मिनलजीनी उत्तम मार्गदर्शन केले.पिडीत बालके समितीसमोर हजर केली जातात. .  बालकाचे वय, निष्पाप निरागसता याचे अजिबातच भान नसलेल्या  बालकांकाविषयी संवेदनशीलता नष्ट झालेल्या समाज  कंटक, विकृत  व्यक्ती कोणत्या थराला जाऊन विघातक कृत्य करतात या विषयी  संवाद साधला. समाजाची वेगळी बाजू अशी असू शकते या विचाराने सत्रानंतर एक निशब्द शांतता झाली.  समाजाचे आपण देखील  एक घटक आहोत मदतीची गरज असणार्या मुलांना मदत करणे हे समाजातील सर्व  नागरिकाची जबबदारी आहे. या  महत्वाच्या संदेशाने सत्राचा शेवट झाला.

शुक्रवार  दिनांक १२ जानेवारि २००१८  रोजी सामाजिक कार्यकर्ता अभ्यासक्रमाचे दुसरे सत्र ज्ञानसाधना महाविद्यालयात घेण्यात आले. अभ्यासक्रमाचे दुसरे सत्र  “व्यक्तिमत्व विकास” या विषयी घेतले.  आजचे मार्गदर्शक श्री. संदीप ढोबळे पेश्याने वकील आहेत.  तसेच  संभाषण कौशल्य या विषयात तज्ञ आहेत. वक्त्याच्या ठिकाणी  कोणते गुण असावेत, संभाषण कला कशी जोपासावी, संभाषण करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, संभाषण सुरुवात कशी करावी. उठावदार संभाषण कसे करावे  आदी विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच मुलांच्या आग्रहखातर माहितीचा अधिकार या विषयी देखील त्यांनी माहिती दिली आणि सर्वात म्हणजे माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा? याचे प्रात्यक्षिक घेतले. राष्ट्रीय युवा दिन आणि त्या निमित्ताने समतोल फाउंडेशन तर्फे युवा गटासाठी घेतलेला सामजिक कार्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि युवकाशी केलेली विचारांची आदानप्रदान खर्या अर्थाने साजरा झाला राष्ट्रीय युवा दिन