Swatchata Abhiyan


 

२ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्ताने  स्टेशन वरील मुलानी राबविले स्वच्छता

अभियान

समतोलच्या खुल्या निवारागृहातील  मुलांनी आज गांधी जयंती निमित्त दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथे स्वच्छता अभियान राबविले. अभियानाच्या सुरवातीला मुलाना स्वच्छतेचे महत्व सांगितले. रघुपती राघव राजाराम हा अभंग सर्व मुलांनी एकत्र येऊन म्हंटला.  स्टेडीयम, मधील; परिसर व मैदानातील साफसफाई केली. अतिशय उत्साहाने मुलांनी सह्भाग घेतला.

साफसफाई नंतर वयक्तिक स्वच्छतेविषयी सतीश बल्मिकी यांनी मुलाना मार्गदर्शन केले. हातांची स्वच्छता करताना सात सात पद्धतीचे प्रात्यक्षिक त्यांनी मुलांना दाखविले व मुलांकडून करून घेतले.