Lokmat Hello Thane

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

                                 गौरव

मुल कोणाला म्हणावे असे जर कायद्याच्या चष्म्यातून बघितले तर जी मुले वयाची १८ वर्ष पूर्ण केली नाही असे जुवेनाईल जस्टीस अँक्ट २०१५ मध्ये म्हंटले आहे. बालक असा शब्द प्रयोग होत असतो ज्यामध्ये मुले किवा मुली या दोघांनाही बालक शाबाद्प्र्योग होत असतो. पण या दोन्हीमध्ये बदल काय तो शारीरिक व मानसिक. कायदा मात्र दोघांनाही समान मानतो व समान हक्क व अधिकार कायद्याने दिलेले आहे. परंतु कायद्याने अजून एक नवीन आयाम तयार करण्याची गरज आहे असे आम्हाला मुलांबरोबर कार्य करताना दिसले काय असावे ते आपण आज याच मुलाबरोबर आलेला अनुभव पाहणार आहोत. 

गौरव नावं तसे मुलाचे वाटते पण शरीर मुलाचे असले तरी मन मात्र मुलीचे होते अशाप्रकारची एक नाही अशी अनेक मुले समतोल  फाउंडेशनच्या संपर्कात आली नेहमीप्रमाणे समतोल कार्यकर्त्याची नजर गौरववर गेली. गौरव आपल्या डोक्यावर ओढणी घेऊन पैसे मागत मागत .लता वानखेडे समतोल कार्यकर्ता यांच्या समोरच आला समतोलची सिंधुताई सपकाळ म्हणून अनुभवी कार्यकर्ती लता वानखेडेला मानले जाते . 

लताने खूप छानपणाने गौरवला विश्वासात घेतले प्रथमता गौरवने लताला अनेक शिव्या दिल्या कारण ह्या शिव्या म्हणजे मुले देतात तशा नव्हे तर त्य तुर्तीयपंथी ज्या पद्धतीने टाळ्या वाजून देतात तशा होत्या . लताने आपल्या चाणाक्ष बुद्धीने गौरवला त्याच्याच भाषेत उत्तर दिले. गौरव थोडा चपापला. १३/१४ वर्षाचा मुलगा स्वताला तृतीयपंथी समजत होता .त्यामुळे मला कुठे घेऊन जातीस? “मि काय मुलगा नाही हिजडा आहे हिजद्यला कुठे ठेवणार? अशी विचारणी गौरव करू लागला. आमच्याकडे तुमच्यासारखीच मुले राहतात असे विश्वासाने सांगून गौरवचा विश्वास संपादन केला. स्टेशन वरील प्रक्रिया पूर्ण झाली. गौरव व लता ट्रेन मधून समतोलच्या मनपरिवर्तन केंद्राकडे येऊ लागले गौरव शांत बसत नव्हता मधेच दरवाज्याकडे जाऊन डोकावत असत याबाबत लताने धोका ओळखून त्याला बायकांमध्ये बसवून कल्याणपर्यंत आणले. गौरवला बायाकाची भाषा हुबेहूब येत होती. त्यमुळे अनेक बायकांनाही आश्चर्य वाटत होते .दरवाज्याजवळ गौरव आपला साथीदार दिसतो का? म्हणून बघत होता कारण त्यांच्या गुरूकडे अनेक चेले असतात व ते काम करत असतात .गौरव शिबिरात आला प्रथमतः गौरवने प्रतिसाद दिला नाही हळूहळू मुलांसारखे कपडे घालयला सुरवात केली मुलांची मानसिक व शारीरिक स्थितीचा अभ्यास करणे व त्यनुसार मुलाचे मनपरिवर्तन करणे हे शिबिराचे सूत्र आहे .त्यामुळे गौरव हळूहळू स्वताला मुलगा आहे असे समजू लागला परंतु आठवण झाली कि टाळ्या वाजून वाजून दुसऱ्या मुलानाही त्रास देत असे. कधी कधी काही देवाची गाणी लागली कि देव अंगात आल्यासारखे गौरव करत असे. व कार्यकर्त्य्नही घाबरावे म्हणून प्रयास करत असे .खर तर शिबिरातील कार्यकर्ते हे एक प्रशिक्षित व अनुभवी कार्यकर्ते असतात मुलाच्या अनेक सवयी त्यांना माहित असतात परंतु हे प्रकरण थोडे वेगळे होते सर्व कार्यकर्ते गौरवच्या मनाचा अंदाज घेऊ लागले व वैक्तिक समुपदेशनावर भर देत त्याच्या मनाचा अंदाज घेऊ लागले .गौरवची

 

माहिती हळूहळू उघड होत होती गौरवला आई आजी व भाऊ आहे भायखळा स्टेशनच्या बाहेर पत्र चा;ली मध्ये गौरवची आई आणि कुटुंब राहते शिवाय गौरवची आई महानगरपालीकामध्ये सफाई कामगार आहे. घरची परिस्थती मध्यम स्वरुपाची आहे त्यामुळे गौरव शाळेत हि जात होता एक दिवस गौरवच्या आईने एक तृतीयपंथी घरी आणला होता व त्याची नजर गौरववर पडली हा आमच्याच समाजाचा दिसतो असे त्यांनी सांगितले व पैशाचे आमिष दाखवून त्याने गौरवला आपल्या जाळ्यात ओढले होते .गौरवला पैशाची चटक लागली होती टाळी वाजवली कि पैसे मिळतात हे सूत्र त्याने मनावर घेतले होते हळूहळू गौरव त्यांची भाषाही शिकला होता अंगात येणे उजवा पाय पुढे करून उभे राहणे कमर लचकत चालणे असे अनेक प्रकार गौरव करत असे टाळ्या तर खूप चांगल्या पद्धतीने गौरव वाजवत होता म्हणून गौरवची  कमाई जास्त होत असे . शिबिरातील वातावरणात ह्या गोष्टी सहकार्यांना सांगत होता तसेच ह्या गोष्टी खोट्या आहेत हे हि त्याला माहित होते परंतु पैसे मिळतात म्हणून त्याने स्वताची मानसिकता बदलून घेतली होती आणि त्याला शिकवणारे त्याचे गुरु त्याच्या मनावर बिंबवत होते. अनेक ४\५ चेले हा प्रकार करून गुरूकडे पैसे जमा करत होते त्यमुळे गौरव स्वताला हिजडा म्हणून घेत होता त्याला कोणताही आनंद घेता येत नव्हता पण शिबिरात गौरव पुन्हा मुलाचे बालपण बघून स्वताही बालपणात रमत होता  त्यमुळे गौरव स्वतः करत असलेल्या चुकांवर बोलत असे हळूहळू गौरव ४५ दिवसात पूर्णपणे मुलगा झाला होता .त्याने टाळी वाजविणे सोडले होते त्याला शिक्षणाची आवड पुन्हा निर्माण  झाली होती परंतु आमच्या दृष्टीने हा स्पेशल विषय होता .ज्या मुलांची शरीरे माणसाची आहेत पण भावना स्त्रियांच्या आहेत अशा मुलांचे पुनर्वसन कोणी करायचे ?यासाठी कायद्यातील तरतूद काय ? कारण यांच्या मनस्थितीचा अभ्यास झाला नाही तर मुलांच्या वसतिगृहात किंवा कोठे हि ठेवले तरी काही मुलांकडून त्रास होण्याची शक्यता असते आणि मुलीच्या वसतिगृहात यांना ठेवता येणार नाही कारण यांच्या शरीराची तशी रचना नसते समाजात स्थान देताना अनेकजण छळतात टोचतात त्यमुळे हि मुले आपला वेगळा समाज बनवू पाहतात

या मुलांचे पुढे काय म्हणून अनेक प्रशन अनुउत्तरीत आहेत परंतु अनेक वर्ष कामाच्या अनुभवातून गौरव सारख्या एखाद्या मुलाला का होईना या मानसिकतेतून बाहेर काढून बालकाचे बालपण देऊ शकलो याचे भाग्य समतोलच्या संपूर्ण टीमला जाते.असे अनेक मुले वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या समस्येला  घेवून समतोल मध्ये येत असतात  व समतोलच्या स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्रात मनपरिवर्तन होवून पुढच्या भविष्याकडे वाटचाल करतात. गौरवच्या आईला आम्ही समुपदेशन केले पैशाची चटक मुलांचे आयुष्य कोणत्यही स्तरावर नेवू शकते व संपूर्ण आयुष्य उध्वस्त होवू शकते  याची जाणीव पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्षपूर्वक जाण ठेऊन बघितले पाहिजे .   

समतोलच्या मनपरिवर्तन शिबिराच्या समारोपात गौरव मध्ये झालेला बदल बघून हा माझाच गौरव का? असा प्रशन गौरवच्या आईच्या चेहऱ्यावर अश्रूतून सांगत होता कार्यकर्त्यांनी एक वेगळा अनुभव घेऊन आपल्या ज्ञानात भार पडली होती गौरवला आपली चूक कळली होती व आपले बालपण आपण हरवतोय हे हि त्याला कळले होते म्हणूनच त्याने स्वताचे मनपरिवर्तन केले होते आणि आता तो गौरव पुन्हा तयार झाला होता .आम्हाला आमचा समतोल साधता आला यासारखे भाग्य आमचेच याचा आनंद समतोलच्या टीमने घेवून पुढची आव्हाने स्वीकारण्यास पुन्हा तयार झाले होते .