३३ वे मनपरिवर्तन शिबीर समारोप

दिनांक : 20  मे २०१८

३३ वे मनपरिवर्तन शिबीर समारोप (कल्याण मामणोली गाव )


 

समतोलला मिळाले पुन्हा एक समाधान आणि चिमुकल्याना  मिळाले घरटे

समतोल फाउंडेशनचे ३३ वे मनपरिवर्तन शिबीर मामणोली येथील स्वामी विवेकानांद मनपरिवर्तन केंद्र येथे  दिनांक १२ एप्रिल २०१८ रोजी सुरु करण्यात आले होते या शिबिराचा समारोप दिनांक २० मे २०१८ रोजी संपन्न झाला.    या शिबिरात महाराष्ट्र ,बिहार,ओडिसा,झारखंड इत्यादी विविध राज्यातील मुलांचा समावेश होता.

ज्येष्ठ नागरिक प्रभाकर मालबारे यांच्या हस्ते समतोल  फाउंडेशनच्या स्वामी विवेकनंद मनपरिवर्तन केंद्राचे व्यासायिक प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले .

मा .सौ. उपेक्षा भोईर  (कल्याण डोंबिवली) उपमहापौर , हिंदू सेवा संघाचे श्री अण्णा वाणी,श्री सुरेशजी अय्यर, ज्येष्ठ नागरिक संघ माटुंगा , सौ. सरोज श्रीवास्तव,अध्यक्षा स्फूर्ती महिला मंडळ,सौ. भावना प्रधान, ज्येष्ठ सामजिक कार्यकर्त्या ,श्री हरीहरण समतोल चे ट्रस्टी आदि मान्यवर उपस्थित होते.

दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिबिरातील विविध राज्यातील एकूण २० बालकांना पालकांकडे हस्तांतरित करण्यात आले समतोलच्या कार्याचे कौतुक करून आम्ही  सुध्दा या कार्यास हातभार लावून सामाजिक जबाबदारी पार पाडू  अशी  अशा आश्वासनाने .महापौर उपेक्षा भोईर यांच्या सह सर्व उपस्थित मान्यवर तसेच समतोल मित्रांनी आपले मनोगत व्यक्त केले.

समतोल शिबिरामुळे  मुलांना चांगल्या वाईटगोष्टीतील फरक, कुटुंबाचे महत्व समजले. कधीहि न रडणारी मुले आज भाऊक होऊन रडली व त्यांनी  आम्ह्लां वाकून नमस्कार केला. मुलांकडून प्रथमच अशा प्रकारचा सन्मान मिळाल्याचा मत काही पालकांनी आपल्या मनोगततून व्यक्त केले.

समतोल चे मुख्य उद्धिष्ट समता, ममता, तोहफा लक्ष्य आहे. प्रत्येक मुलाचा धर्म, जात,पंथ, यांचा आदर राखत समतोल परिवारात येणारे प्रत्येक मुल समान आहे. शिबिरातील अब्दुल या मुलाने कुराणातील कलमा पठण करून सर्व मुलांच्या सुखासाठी प्रार्थना केली.   

.संस्थेचे  सचिव संस्थापक श्री विजय जाधव यांनी उपमहापौर श्रीमती उपेक्षा भोईर यांच्यासमोर कल्याण  स्टेशनवर काम करीत असताना जागेच्या अडचणीचा प्रस्ताव मांडला असता श्रीमती उपेक्षा भोईर यांनी जागेचा प्रशन  सोडवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न माझ्याकडून  केले जातील असे आश्वासन दिले. समतोलचे कार्यकर्ते श्री मुबारक  मगदूम सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली .