२३ जुलै २०१८ (आषाढी एकादशी) || दिंडी बाल कट्टयाची .....दिंडी संस्कार रुजवण्याची ||

२३ जुलै २०१८ (आषाढी एकादशी)

          || दिंडी बाल कट्टयाची .....दिंडी  संस्कार रुजवण्याची ||

समतोल बाल  संरक्षण समिती अंतर्गत येणाऱ्या बालकट्ट्यावरील बालकांसाठी   आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले. मी रोज शाळेत जाईन,मी मोठ्या व्यक्तीचा आदर करेन, मी गुटखा खाणार  नाही, मी शिवी देणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी रोज बाल कट्ट्यावर येईन अशा विविध घोषणा मुलांनी दिल्या. तसेच या आशयाचे मुलांनी फलक देखील हातात धरले होते.   

दिंडीच्या माध्यमातून वस्तीतील  मुलांवर विविध संस्कार, मूल्य शिक्षण  करण्यसाठी उपक्रमच्या माध्यमातून बाल कट्टा नेहमीच सक्रीय असतो.आज आषाढी एकादशीनिमित  संस्कार, मूल्य शिक्षणाची ध्वजा फडकविली.

दिंडीच्या वेळी वस्तीतील  बाल कट्टयावरील २७ मुले, बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य श्री.विजय जाधव ,  बाल कट्टा प्रमुख सुरेखा साळवे , बालकट्टाच्या शिक्षिका अश्विनी भंडारी, स्नेहल मुळीक  समतोल कार्यकर्ते सुवर्णा घाडगे, लक्ष्मी मुकादम,सतीश वाल्मिकी, समतोल समन्वयिका आरती नेमाणे  आणि पालक इत्यादीनी दिंडीत सहभाग घेतला.