BalMhaotsav 2019

समतोल फाउंडेशन आयोजित बाल महोत्सव उत्साहात संपन्न

समतोल फाउंडेशन ही एक नात जोडणारी संस्था आहे. विविध कारणांमुळे घरातून पळून जाणाऱ्या लहान वयातील मुलांना आधार आणि आसरा देणारी व त्याचबरोबर त्यांचा मनामध्ये असणारे क्लेश व लहान वयामध्ये परंतु भरकटलेले विचार याना समुपदेशन करून एक चांगला विद्यार्थी घडावा व या येणाऱ्या मुलांचा मनामध्ये आपला कुटुंबाप्रथि आदर,प्रेम व संयमाने राहण्यासाठी शिकवणारी एक आदरातिथ्य संस्था म्हणजे समतोल फाउंडेशन या संस्थेचा नावावरूनच त्याचा असा अर्थ केला आहे की स- समता, म- ममता, तो - तोहफा, ल- लक्ष्य अशी याची व्याख्या केली आहे. मातृत्व पितृत्व पासून दूर जाणाऱ्या मुलाना घरवापसी करणारी व अल्पावधीतच आपला कार्याचा जोरावर नाविन्यपूर्ण झालेली संस्था म्हणजे समतोल फाउंडेशन होय.
यामध्ये भारतातील अनेक प्रांतांतून घरदार सोडून आलेल्या आणि भीक मागणे, बुटपॉलिश करणे अथवा पडेल ती कामे करून करणाऱ्या अशा मुलांना संस्थेत आणून त्यांच्यात पुन्हा घराची ओढ निर्माण करण्याचे कार्य २००५ सालापासून समतोल फाउंडेशन करत आहे. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममधील एका छोट्याशा गाळ्यात सुरू असलेल्या या संस्थेचे काम मात्र मोठे आहे. आजवर सहा हजार मुलांना समतोलने पुन्हा आपल्या घरट्याकडे सुखरूप पाठवले आहे.

9 फेब्रुवारी 2019 बाल महोत्सव विशेष

प्रथमता मुलांचे स्वागत करीत असताना त्यांचे तोंड गोड व्हावं व असाच गोडवा निरंतर राहावा या दृष्टीने त्यांचा स्वागतासाठी लाडू देऊन केले. त्यामध्ये सुद्धा लहान मुलांचा शरीरासाठी पौष्टिक असणारे तिळाचे लाडू दिले हे सांगण्याचे कारण म्हणजे संस्था करीत असणाऱ्या प्रत्येक कार्याचा फायदा होण्यासाठी नेहमीच दूरदृष्टी व नियोजनबद्द असे कार्य करते.
आजकाल खेळा मध्ये राष्ट्रीय आंतराष्ट्रीय स्थरावर मुले खेळताना दिसून येतात परंतु त्यांचा कला गुणांना वाव मिळण्यासाठी समतोल फाउंडेशन चा माध्यमातून विविध शाळांना आपला कक्षेत बोलवून विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा संपन्न झाला. लहान मुले असल्याने त्यांचा भोजनाची व्यवस्था ही संस्थेकडून उत्कृष्ट आशा पद्धतीने केलेली होती. ही लहान मुले म्हणजेच उद्या देशाचे भावी नागरिक असणार आहेत. याचा विचार करून वाढत चाललेला अंधश्रद्धा व रूढी परंपरेने चालत आलेला चालीरीती याना मोडीस काढून विज्ञान वादी विचारसरणी तयार करण्याचा मानस संस्थेने डोळ्यासमोर ठेऊन अंधश्रद्धा निर्मूलन बाबतीत लहान मुलाना समजेल अशा काही आपला कौटुंबिक वातावरणात घडणाऱ्या गोष्टीचे सत्य सांगून चिमुरड्यांची मने जिंकली.(यामध्ये जादूटोणा,काही अशुभ मानल्या जाणाऱ्या बाबी जसे की मांजर आडवे जाणे, गुबड ओरडणे) यासारख्या अंधश्रद्धाळू विचारातून बाहेर काढून विज्ञानवादी विचार या शालेय मुलांपर्यंत रुजविण्याचे कार्य 9 फेब्रुवारीच्या कार्यक्रमात समतोल फाउंडेशन केले त्यामध्ये जवळपास 250 विद्यार्थ्यां उपस्थित होते.
त्याच बरोबर दिव्यांग व्यक्तींचा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा पार पडला. तो कार्यक्रम घेण्यामागील उद्देश म्हणजे आज प्रत्येक लहान मुलगा आज स्वतःला कमी समजतो कारण मला हे जमत नाही मला ते येत नाही परंतु ते येणासाठी प्रयत्न करणे उचित असते. याच प्रमाणे ज्या दिव्यांग व्यक्ती करू शकतात म्हणजे आपणास तर देवाने सर्व काही दिले आहे. मग आपण मागे का? मी स्वतःला कमी का समजू? हा दृष्टिकोन मुलांचा मनामध्ये रुजला पाहिजे. यासाठी कार्यक्रमचे आयोजन केले होते व ते प्रत्यक्ष त्या मुलांनी पाहिले. जरी लहान असली तरी मनाला स्तब्ध करणारी नृत्य कला सादर झाली व त्याचा चिमुकली आनंद घेताना मनाला खूप समाधानकारक वाटले. प्रत्येक विद्यार्थ्यांना एक स्वतः बाबत विश्वास निर्माण झाल्याचे दिसून आले व कार्यक्रम जरी उशिरापर्यंत चालला असला तरी मुलांच्या उत्साहात उत्कृष्ट साजरा झाला.
शेवटी निरोप घेताना लहान मुलांना या संस्थेची आठवण राहावी म्हणून शालेय उपयोगी वस्तू म्हणून प्रत्येक मुलाला एक बॅग देण्यात आली. मुलाना जेवण,नाश्ता ,चाय
यांचे संस्थेनं छान नियोजन केले सर्व शिक्षकांनी व संस्थेचा कार्यकर्ते यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले.